कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवली,(जि.ठाणे)

सामाजिक उपक्रम


शैक्षणिक उपक्रम

बालक पालक मेळावा  -

रविवार  दि. १९.०७. २०१५ रोजी सायंकाळी ४. ३० वाजता  संस्थेच्या सभागृहात  बालक पालक मेळावा व विद्यार्थी गुण गौरव हा कार्यक्रम प्रमुख पाहुणे वैद्य श्री. मंगेश प्रकाश देशपांडे (आयुर्वेदिक चिकित्सा व पंचकर्म) व वक्ते श्री. दिनेश जगन्नाथ मोरे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. अरुण अ. नाटेकर यांच्या हस्ते शिक्षण दत्तक योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले. इ. दहावी व बारावी मध्ये प्राविण्य व शिष्यवृत्ती मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक व गुण गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष बाब म्हणजे श्री.योगेश रायकर हा आपल्या संस्थेचा माजी लाभार्थी विद्यार्थी होता.त्याने याची जाण ठेऊन इ. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.  वक्ते श्री. दिनेश जगन्नाथ मोरे सर यांनी मुलांना व पालकांना गोष्टीद्वारे मार्गदर्शन केले . प्रमुख पाहुणे वैद्य श्री.मंगेश प्रकाश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना श्लोक,ओंकार व शिस्त यांचे महत्व सांगितले. ह्या कार्यक्रमात आर्टस् स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी नृत्याचा कार्यक्रम केला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित असलेल्या सर्वांनी अल्पोपाहार व चहा घेतला. 

यावर्षी   शैक्षणिक  उपक्रमांतर्गत शिक्षण समिती व संचालक मंडळाने खाली नमूद केलेल्या विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथे आवश्यक असणाऱ्या शालेय गरजांची माहिती घेऊन संस्थेला शक्य असलेल्या सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या. 

१) सत्कर्म श्रध्दाश्रय - पनवेल 

२) प्रगती अंध विद्यालय - बदलापूर 

३) श्री कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ - पाली 

४) वनवासी विकास प्रकल्प - तलासरी 

५) भरारी अस्थि विकलांग संस्था - डोंबिवली 

६) भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान - कर्जत 

७) राधाबाई साठे कन्या शाळा - डोंबिवली 

८) पि. आर. म्हैसकर प्राथमिक विद्यालय - डोंबिवली 

९) जिल्हा परिषद शाळा - धनगरवाडी 

शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये विशेष गुण प्राप्त केलेल्या ज्ञातीतील विद्यार्थ्यांना संक्रांत संमेलनात गौरवण्यात आले.   


आरोग्य सेवा उपक्रम

१) रक्तदान शिबिर -

प्रतिवर्षी प्रमाणे याहिवर्षी अंबरनाथ येथे चार आणि डोंबिवली येथे एक अशी एकूण ५ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात  आली होती. ५०० बाटल्या रक्त जमा करण्यात आले.

 

२) नियोजन ताणाचे ,प्रयोजन प्रगतीचे शिबिर -

रविवार दि. १९ जुलै २०१५ रोजी  ^नियोजन ताणाचे ,प्रयोजन प्रगतीचे ^ ह्या समुपदेशनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले होते. इ. ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनासाठी डॉ. श्री. अद्वैत  ल. पाध्ये  (मानसोपचार तज्ञ ) डॉ. श्री. दिलीप पोतनीस (योग्य तज्ञ ) व डॉ. श्रीमती श्वेता बंगाली (समुपदेशक) उपस्थित होते. डॉ.श्रीमती मनीषा वि. मोघे यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सन फार्मा कंपनीने ह्या कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली होती. यामध्ये भाग घेणाऱ्यांना विनाशुल्क प्रवेश व भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १०० जणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.  


३) योगसाधना शिबिर -

शुक्रवार दि. २ ऑक्टोबर २०१५ ते रविवार दि. ११ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत सुलभ योगसाधना या शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. ३० व्यक्तींनी सदरहू शिबिराचा लाभ घेतला. 


४) अस्थि घनता व स्थूलता मापन शिबिर-

रविवार दि. २७ डिसेंबर २०१५ रोजी अस्थिघनता व स्थूलता मापन शिबिर घेण्यात आले. ५५ व्यक्तींनी सदरहू  शिबिराचा लाभ घेतला. 


५) मोफत नेत्र तपासणी शिबिर -

शनिवार दि. ०६ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत जगातील सर्वात मोठे आय केअर नेटवर्क  ^वासन आय केअर हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सुमारे ९० व्यक्तींनी सदरहू शिबिराचा लाभ घेतला.  कार्यक्रमाला इच्छुकांचा  उत्तम प्रतिसाद मिळाला. 


६) जागतिक काचबिंदू दिन व कर्करोगासंबंधी माहिती -

रविवार दि. २० मार्च २०१६ रोजी संस्थेच्या समाजमंदिर सभागृहात कर्करोग तज्ञ डॉ. श्री. अनिल अ. हेरूर यांचा कर्करोगावर "लवकर निदान मिळेल जीवदान "हा कार्यक्रम आणि जागतिक काचबिंदू दिनानिमित्त नेत्ररोग तज्ञ डॉ. सौ. अनघा अ. हेरूर  यांचा "असेल दृष्टी तर पाहाल सृष्टी " हा कार्यक्रम आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. 


७) यावर्षी एकूण ९ जणांना वैद्यकीय मदत करण्यात आली. 


बातमी
रक्तदान - श्रेष्ठदान
श्रद्धांजली
माहिती लवकरच उपलब्ध होईल ..............!!!