कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवली,(जि.ठाणे)

आमच्य़ा विषयी


॥ श्री:॥

     संहति: कार्यसाधिका हे बोधवाक्य स्वीकारून त्यानुसार सर्वाना सोबत घेऊन सामाजिक उत्थानासाठी कार्यरत असलेली कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, डोंबिवली,जि.ठाणे ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली संस्था, गेली ४०-४२ वर्षे ठाणे जिल्हा व आजुबाजूच्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहे.

      ७० च्या दशकात डोंबिवलीमध्ये अंदाजे २५० कुटुंबे राहात होती आणि बरीचशी मंडळी ‘कऱ्हाडे ब्राह्मण संघ’- मुंबईचे सभासद होते. त्यावेळी कै.श्री.पांडुरंग गणेश भडकमकर यांच्या मनांत विचार आला की, एवढया मोठया संख्येने आपले लोक येथे वास्तव्य करून असताना डोंबिवलीला आपली संस्था का बरे नसावे? त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देईना आणि मग श्री.शरद वामन पुसाळकर यांना बरोबर घेऊन त्यांनी संपूर्ण डोंबिवली अक्षरश: पिंजून काढली. सर्व क−हाडयाना आपला मानस सांगून एकत्र आणले. विचार तर सर्वांनाच पटला होता. त्यानंतर १-२ वेळा एकत्र जमून चर्चा करून दि.२५ एप्रिल १९७१ रोजी, श्री.जयराम केशव करंबेळकर यांचेकडे पहिली सभा होऊन त्यामध्ये अशी संस्था स्थापन करण्याचा औपचारिक निर्णय घेण्यात आला, आणि एक अस्थायी समिती स्थापन करून प्रत्यक्ष कार्याचा शुभारंभ झाला, आणि आज संस्थापक सदस्य कै.श्री.पांडुरंग गणेश भडकमकर आणि श्री.शरद वामन पुसाळकर यांनी लावलेल्या ह्या रोपट्याचे आपणा सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नाने वटवृक्षात रुपांतर झाले ही एक अत्यंत अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे.

      एखादे अंतिम ध्येय हा केंद्रबिंदू ठरवून सतत कार्यरत राहिले की संस्था कशी उमलते आणि विस्तारते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ‘कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, डोंबिवली’ होय !

      ज्ञाती विरहीत विकासाबरोबर ज्ञातीबांधवांना एकत्र आणण्यातही संस्थेने पुढाकार घेतला व त्यातूनच ‘भारतीय क−हाडे ब्राह्मण महासंघ’ आणि ब्राह्मण महासंघ’ यांचे पितृत्वही यशस्वीपणे निभावले.

      संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अविरत अथक प्रयत्न आणि दांडगा जनसंपर्क याचे फलित म्हणजे संस्थेची स्वतःच्या मालकीची वास्तू,संपूर्ण समाजाचे उत्थान हे संस्थेचे ध्येय असल्या मुळे या वास्तूचे ‘समाज मंदिर’असे यथोचित नामकरण करण्यात आले आहे.संस्थेचे ध्येय ठरल्या नंतर समाजाच्या सर्वंकष उत्थानासाठी आवश्यक असलेले शिक्षण,आरोग्य,कुटुंब कल्याण या विषयांशी निगडीत अनेक उपक्रम राबवायला सुरवात झाली.

      कल्पना करा की ‘माझ्याकडे मुठभर आहे, त्यातले चिमुट भर कमी झाले तर मी उपाशी राहणार नाही’पण तीच चिमुट कोणाच्यातरी भुकेचा आधार ठरेल,आर्थिक अडचणींमुळे अर्धवट सोडावे लागणारे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करील,कुणा रुग्णाला आयुरारोग्य मिळवून देईल.सर्वात महत्वाचे म्हणजे ती एक चिमुट एक सुशिक्षित,सशक्त समाज उभारण्याच्या कामाचे समाधान आपणास मिळवून देईल.

      आपणाकडे कोणताही उत्सव व समारंभ असेल तेव्हा किवा आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृती दिनी करण्यात येणाऱ्या खर्चाचा एक छोटासा हिस्सा संस्थेकडे देणगी स्वरूपात पाठवून त्या स्मृती चिरस्मरणीय करू शकता.एवढेच काय,पण जमेच्या बाजूला कधी विचारातही न घेतलेली घरातील रद्दी विकून आलेली रक्कम आपण देणगी म्हणून संस्थेला दिलीत तरी ती रक्कम सुद्धा संस्थेचा एखादा उपक्रम चालविण्याचे अत्यंत महत्वाचे काम करू शकते.

      संस्थेने समाजहित नजरे समोर ठेवून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.त्यांची संक्षिप्त माहिती पुढे दिली आहेच.आपण सुद्धा यथा शक्ती मदत करून समाजसेवेचा हा गोवर्धन पर्वत पेलावाण्यास संस्थेला हात भार लावावा असे या निमित्याने आवाहन करावेसे वाटते.

 बातमी
रक्तदान - श्रेष्ठदान
श्रद्धांजली
माहिती लवकरच उपलब्ध होईल ..............!!!